ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी परिचारिका बनली गायिका - अमरावती गायक परिचारीका बातमी

रुग्णांचे दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील एक पारिचारिका चक्क गायिका बनली आहे. ती आपल्या रुग्ण सेवेबरोबरच अतिदक्षता विभागातील रुग्णांजवळ जाऊन गीत गायन करत आहे.

nurse became singer in amravati
अमरावती : कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी परिचारिका बनली गायिका
author img

By

Published : Jun 1, 2021, 4:57 PM IST

अमरावती - कोरोनाच्या या भयावह काळात अनेकांच्या मनात प्रचंड भीती आहे. कारण या रुग्णांना नातेवाईकांपासून दूर राहून रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. अनेक दिवस नातेवाईकांसोबत भेटीगाठी होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या मनात भीती, दुःख हे कायम राहते. त्यामुळे हे दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील एक पारिचारिका चक्क गायिका बनली आहे. ती आपल्या रुग्ण सेवेबरोबरच अतिदक्षता विभागातील रुग्णांजवळ जाऊन गीत गायन करत आहे. त्या गायनाच्या माध्यमातून ती रुग्णांमध्ये हर्ष उल्हास व भयमुक्त वातावरण तसेच त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. किरण वाघमारे असे परिचारिकेचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्ण सेवेबरोबरच रुग्णांसाठी गायन करण्याचे काम ती करत आहे. तिच्या या कामाचे कौतूकदेखील केल्या जात आहे.

प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी झाले होते ग्रामगीता वाचन -

दोन महिन्यांपूर्वी या रुग्णालयात भर्ती असलेले एक कोरोनाबाधित रुग्ण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचे वाचन करत होते. या माध्यमातून तुकडोजी महाराज यांचे विचार हे रुग्णांपर्यत पोहचवून त्यांना आधार देत होते. आता किरण वाघमारे यासुद्धा अशाच प्रकारचे काम करत आहे.

रुग्ण देतात उपचाराला प्रतिसाद -

रुग्णांजवळ गीत गायन केल्याने त्यांचे मनोबल तर वाढते. तसेच त्यांना आधारही मिळतो. भयमुक्त वातावरणातून त्यांना दिलासा मिळतो. जेव्हा आम्ही गायन करतो, तेव्हा रुग्ण उपचारालाही चांगला प्रतिसाद देत असल्याचे किरण वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - अमरावती : कोरोना संदर्भातील निर्बंध शिथील होताच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details