अमरावती - शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून एकूण आकडा 19 वर पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे.
अमरावतीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; बडनेरा परिसरातही शिरकाव - corona in amravati
शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून एकूण आकडा 19 वर पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे.
शनिवारी सायंकाळी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर एका मृत पावलेल्या व्यक्तीसह तीन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. युसुफनगर येथील 52 वर्षाचा पुरुष जिल्हा रुग्णालयात 23 एप्रिलपासून दाखल होता. आज दुपारी 4 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
दुसरी व्यक्ती बडनेरा येथील असून त्यांचे वय 53 आहे. त्याचप्रमाणे तरखेडा येथील 23 एप्रिलला निधन झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेला 33 वर्षाच्या व्यक्तीला लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबधित असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांना उपचार पूर्ण झाल्याने डिस्चार्ज देण्यात आलाय.