अमरावती- शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा सोमवारी 21 वर गेला आहे. शहरात कोरोनामुळे 7 जण दगावले असून संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
अकोला येथील शाकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज 10 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी 24 एप्रिलला दगवलेल्या ताज नगर परिसरातील 72 वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत 3 एप्रिलला पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यावर 25 दिवसात अमरावतीत कोरोनाबधितांची संख्या 21 वर पोहोचली असल्याने आता सर्वत्र कोरोनाची भीती पसरली आहे.
दरम्यान, राजापेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाची तपासणी झाल्यामुळे त्या रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचरिकांचा स्वॅब आज तपासणीसाठी घेतला जाणार असून या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 21; मृतांचा आकडा 7 वर
अकोला येथील शाकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज 10 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी 24 एप्रिलला दगवलेल्या ताज नगर परिसरातील 72 वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 21; मृतांचा आकडा 7 वर
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीत देखील २५ दिवसांत रुग्णांची संख्या २१ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.