अमरावती- विदर्भाचे नंदवण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड हा महत्वाचा पॉइंट आहे. सुमारे 1 हजार 500 फूट खोल दरी आणि डोंगरावरून पडणारा धबधबा हे या पॉइंटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे मजबूत नसल्यामुळे आतापर्यंत अनेक पर्यटकांनी आपला जीव गमवला आहे. तरीही प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही.
चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर - चिखलधरा
सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी विदर्भातील चिखलदराकडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतात.

चिखलधरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर
चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर
सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी विदर्भातील चिखलदऱ्याकडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतात. त्यामुळे भीमकुंड या पॉइंटवरही पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी अनेकदा या ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडतात. तर कठडे नसल्यामुळे दरीत पडून अनेकांचा या ठिकाणी मृत्यू होतो. त्यामुळे या ठिकाणी कठडे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही.