अमरावती -आलूसे कभी सोना नही बनता.. नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही.. सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, हे गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी ध्यानात घ्यावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी मोदींवर केली होती टीका -
पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवली म्हणजे ते टागोर होऊ शकत नाहीl, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली होती. यशोमती ठाकूर यांची ही टीका भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली.
गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा होत नाही, भाजपचा यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार - bjp targeted to yashomati thakur
नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही.. सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

भाजपचा यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते काँग्रेसवर टीका करताना शिवराय कुळकर्णी
जिल्ह्यात पालकमंत्री आणि भाजपात शीतयुद्ध -
विविध विषयावरून जिल्ह्यात भाजप आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे. यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान किंवा भाजपवर टीका करताच भाजपकडून त्यांना तितकेच बोचरे प्रत्युत्तर दिले जाते.
Last Updated : Dec 26, 2020, 3:38 PM IST