अमरावती -स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची वर्णी लागली. त्यांना प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजपाचे गोपाल तिरमारे यांना ८ मते मिळाली. विशेष म्हणजे पालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपाला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले.
रवींद्र पवार यांच्या निधनामुळे अध्यक्षपद होते रिक्त
नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपातर्फे गोपाल तिरमारे तर प्रहार गटातर्फे नितीन कोरडे यांनी अर्ज दाखल केले होते. पालिकेचे संख्याबळ भाजपा ७, प्रहार ४, राष्ट्रवादी २ तर अपक्ष ४ असे आहे. यात दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार हे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर आज झालेल्या निवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची ९ नगरसेवकांच्या समर्थनाने निवड झाली तर भाजपाचे गोपाल तिरमारे यांना ८ मते मिळाली.