महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Valgaon States Dispute: सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स; वलगावात नऊ जण गजाआड

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने तणावानंतर वलगावातील नऊ जणांना गजाआड करण्यात आले. मोबाइलवर वादग्रस्त स्टेट्स ठेवल्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास वलगावात दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

By

Published : Jun 11, 2023, 10:46 PM IST

Valgaon States Dispute
अटक

अमरावती:वलगाव येथील रहिवासी एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आल्यावर वलगावच्या मुख्य चौकात दोन समुदायातील लोक एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. तर एक मोठा जमाव पोलीस ठाण्यात देखील एकत्र आला. त्यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्याला ताबडतोब अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी दोन्ही बाजुच्या नागरिकांसोबत चर्चा केली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला अटक देखील करण्यात आली.


पोलीस आयुक्तांनी घडवून आणला समेट:घटनेनंतर वलगावात अतिरिक्त पोलीस कुवत तैनात करण्यात आली. पोलीस मुख्यालयासह चार ते पाच ठाण्यांतील पोलीस, क्यूआरटी पथक, वज्र, वरुण वाहनांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला होता. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, सागर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांतील नागरिकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानेही उघडली. रविवारी संपूर्ण वलगावातील व्यवहार नेहमीसारखे सुरळीत झाले.

औरंगजेबाचा वर्धापन दिन: छत्रपती संभाजी नगरात औरंगजेबाचा 364 वा वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले. 13 जून १६५९ ला औरंगजेबचा राज्याभिषेक आहे. 364 वर्ष झाल्याने वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करावा, अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली. अताऊर रहेमान पटेल यावर सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान:गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या नावाने राजकारण तापत आहे. यात अनेक सामाजिक संघटनांनी उडी घेत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकल्याने सामाजिक वातावरण खराब होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूरसह राज्यात इतर ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळेच समाज माध्यमांवर पोस्ट टाकताना सावधान रहा, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण होतील अशा पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होऊन शिक्षा देखील होईल. त्यामुळे समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. समाजात तेढ वाढविणारी पोस्ट टाकल्यामुळे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

हेही वाचा:

  1. Thane Crime News : 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाज पोलिसांच्या जाळ्यात, अलिबाग येथून अटक
  2. Religious Conversion In Delhi : राजधानीत जबरदस्तीने धर्मांतरण, उच्च शिक्षित तरुणाच्या मोबाईलमध्ये आढळली खळबळजनक माहिती
  3. Social Media post on Aurangzeb : औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे सोशल मीडियातून आवाहन; मनसेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details