अमरावती - जिल्हा सामान्य रुगणलायत नेत्र विभागात नेत्रपेढी सज्ज होत आहे. महिन्याभरात ही नेत्रपेढी सुरू होणार आहे. आज जागतिक नेत्रदान दिनाच्या औचित्याला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नेत्र विभागाला भेट दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ही नेत्रपेढी अमरावती जिल्ह्यात अंधत्व निवारणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दृष्टिदान चळवळ व्हावी यासाठी नागरिकांनी नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकऱ्यांनी केले आहे.
नेत्रपेढी सज्ज
जिल्हा सामान्य रुग्णलयातील नेत्र विभागात अत्याधुनिक उपकरणांनी नेत्रपेढी सज्ज झाली आहे. याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंध व्यक्तीला नेत्र बसवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे शस्त्रक्रिया कक्ष तयार आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया केली जाते. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नम्रता सोनोने, डॉ. कुणाल वानखडे यांच्यासह नेत्र समुपदेशक निलेश ढेंगळे या ठिकाणी काम पाहत आहेत.
उद्या अकोल्याचे पथक करणार पाहणी