महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या - अचलपूर

अचलपूरच्या देवडी परिसरात मूकेरीपूरा येथे राहणाऱ्या एका नवविवाहित पत्नीने आत्महत्या केली आहे.

अमरावतीमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

By

Published : May 26, 2019, 8:33 AM IST

Updated : May 26, 2019, 10:00 AM IST

अमरावती - अचलपूरच्या देवडी परिसरात मूकेरीपूरा येथे राहणाऱ्या एका नवविवाहित पत्नीने आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. गुलनाज परवीन शेख इम्रान उर्फ राजा (वय, 21) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी पती शेख इम्रान उर्फ राजा याला अटक केले असून 4 आरोपी फरार आहेत.

गुलनाजला घरातील कामे येत नाहीत, तसेच स्वयंपाक सुद्धा येत नाही, असे आरोप सासरच्या मंडळीकडून तिच्यावर करण्यात येत होते. तिला माहेरवरून पैसे आनण्यासाठी तगादा लावत असल्याची तक्रार वडील अन्वर खान अब्दुल खान (रा. बरर्‍हाणपूर, मध्य प्रदेश) यांनी पोलिसांत केली आहे. गुलजानने विषारी द्रव्य सेवन केल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचे १ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तिला लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत, असल्याचा माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे.

या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी पतीला अटक केली असून सासरे बब्बू खा, सासू इरशाद बानो, दीर शहजाद शेख, ननंद सुरैया, हे 4 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कीशोर भूजाडे करत आहेत.

Last Updated : May 26, 2019, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details