अमरावती -वर्धा नदीत बोट बुडाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेतील 10 जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. मात्र, या दरम्यान मृतकांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती पुढे आहे. अतुल वाघमारे (25) व वैशाली अतुल वाघमारे (19), अशी या दाम्पत्याची नावे असून अवघ्या 22 दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू -
अतुल वाघमारे याचे ऑगस्ट महिन्यांत २२ तारखेला अमरावतीच्या वरुड तालुक्यातील गाळेगाव येथील वैशाली मटारे या तरुणीशी लग्न झाले. दोघांनी आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुखात साथ देण्याचे वचन एकमेकांना दिले. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, ते नियतीला मान्य नव्हते. 14 सप्टेंबर रोजी वरुडच्या झुंज येथील वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटेच त्यांचे मृतहेद हाती लागले आहे.