महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने फुलले 'विदर्भाचे काश्मीर' - new year celebration at chikhaldara

विदर्भाचे काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. सध्या राज्यात थंडीने जोर धरला असून चिखलदरामध्येही थंडी आणि धुक्याने वातावरण झाकोळले आहे. हिरवागार निसर्ग, नद्या, डोंगराची साथ आणि आल्हाददायक वातावरणामुळे सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचे हे काश्मीर फुलून गेले आहे.

amravati
मेळघाटात कडाक्याची थंडी अन् धुक्याची चादर

By

Published : Dec 30, 2019, 10:33 AM IST

Updated : Dec 30, 2019, 3:27 PM IST

अमरावती -यंदाचं वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनला कुठेतरी लांब जावं आणि नववर्षाच्या स्वागताचा मनमुराद आनंद घ्यावा, असे प्रत्येकाच्या मनात असते. विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीच्या चिखलदऱ्यातही नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

मेळघाटात कडाक्याची थंडी अन् धुक्याची चादर

सध्या राज्याभरात थंडीचा जोर वाढला आहे. अशातच आधीच थंड वातावरण असलेल्या चिखलदऱ्यात थंडीने उच्चांक गाठला आहे. या थंडीमुळे चिखलदऱ्याचे सौंदर्य आणखी फुलले आहे. दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ते, वातावरणात गारवा हाड गोठवणारी थंडी अन् समोर पेटलेली शेकोटी अशी काहिशी विलोभनीय दृश्य सध्या मेळघाटात बघायला मिळत आहे.

साधारणत: जुलै महिन्यापासून चिखलदऱ्यातील पर्यटनाला सुरुवात होत असते. मात्र, सध्या वातावरणात असलेल्या गारव्याचा आनंद, त्यातच ख्रिसमस आणि सरत्या वर्षला निरोप देवून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातून पर्यटक येथे दाखल झाले आहेत. निसर्गात असलेली ही अद्भूत किमया येथे येऊन अनुभवतो असे पर्यटक सांगतात. चिखलदऱ्यात विविध पाहण्याजोगे स्थळ आहेत. मात्र, येथील प्रसिद्ध देवी पॉईंट तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकाची पसंती देवी पॉईंटला अधिक दिसून येत आहे. तर, देवी पॉईन्ट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक दिसताहेत.

हेही वाचा - तपोवनात पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव उत्साहात

समुद्र सपाटी पासून हजारो किलोमीटरवर असलेल्या चिखलदरा पर्यटकांना भूरळ पाडणारा आहे. सोबतच जवळच असलेले सेमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकास येथे जाऊन पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अद्भूत नजारा साक्षात अनुभवायचा असेल आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर, तुम्हीही चिखलदरा प्लॅन करायला हरकत नाही.

हेही वाचा - बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजवतात मटण; खवय्यांची गर्दी

Last Updated : Dec 30, 2019, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details