अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 348 तर 225 जणांचा अहवाल येणे बाकी - corona news
वालगाव येथील विलगिकरण कक्षात असणाऱ्या चांदूर बाजार येथील 47 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. साबणपुरा येथील जामा मशीद भागात राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल नागपूर येथील खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.
![अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 348 तर 225 जणांचा अहवाल येणे बाकी amravati covid 19](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:05-mh-amr-04-348-corona-petients-at-amravati-vis-7205575-15062020224855-1506f-03835-518.jpg)
अमरावती - सोमवारी प्राप्त झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या अहवालामध्ये 35 वर्ष वयाचे 2 कोरोनाग्रस्त पुरुष हे राज्य राखीव पोलीस दल वसाहतीतील रहिवासी आहेत. कमेला ग्राउंड परिसरात 30 वर्षीय पुरुष, मच्छिसाथ परिसरात 63 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 348 झाली असून आणखी 225 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त येणे बाकी आहे. अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वालगाव येथील विलगिकरण कक्षात असणाऱ्या चांदूर बाजार येथील 47 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. साबणपुरा येथील जामा मशीद भागात राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल नागपूर येथील खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. जुनी वस्ती बडनेरा येथील माळीपुरा परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय युवकाला कोरोना झाला आहे. तसेच बडनेरा येथील चमननगर परिसरात 75 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला आहे. शारदा नगर येथील रहिवासी असणाऱ्या 55 वर्षाचा पुरुष आणि 50 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.