अमरावती -शहरात मंगळवारी विविध भागातील एकूण 19 नवे कोरनारुग्ण आढळून आले आहेत. यामुळे अमरावतीत आता कोरोना रुग्णांची संख्या 249वर पोहोचली असून या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावतीत आढळले 19 नवे कोरोनारुग्ण; संख्या 249वर - कोरोना लेटेस्ट न्यूज अमरावती
मंगळवारी दिवसभरात तीनवेळा कोरोना चाचणी अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमरावतीत आता कोरोनाबाधितांची संख्या 249वर पोहोचली आहे.
मंगळवारी दिवसभरात तीनवेळा कोरोना चाचणी अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार फ्रेझरपुरा परिसरात 8 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या 8 जणांमध्ये 36, 57, 45, 32 वर्षे वयाच्या चार पुरुषांचा समावेश असून 2, 5 आणि 10 वर्ष वयाच्या तीन बालकांचा तसेच 25 वर्ष वयाच्या महिलेचा समावेश आहे. फ्रेझरपुरा परिसराला लागून असणाऱ्या यशोदा नगर परिसरात 35 वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच परिसरात खळबळ उडाली. सातूरणा परिसरात मालू लेआऊट या भागातही आता कोरोनाचा शिरकाव झाला असून या भागातील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. रतनगंज परिसरात 50 आणि 72 वर्षाच्या महिलेसह एका 50 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.
आज जलाराम नगर परिसरातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून या भागात राहणाऱ्या 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. रामनगर परिसरात राहणाऱ्या 37 वर्षाच्या महिलेलाही कोरोना झाल्याचे आजच्या अहवालात समोर आले आहे. दरम्यान मंगळवारी 19 कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, 3 जू0न, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यांमध्ये अमरावती शहर पूर्णतः खुले करण्याची योजना प्रशासन आखत असताना अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 249वर पोहोचली आहे. त्यामुळे, आता संपूर्ण शहर खुले झाल्यावर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.