महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी - fees

अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे यावर्षीचे आर्थिक गणीत कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण अमरावती विभागात शेती अरिष्टात सापडली आहे.

विद्यार्थ्यांच्या वतीने कुलगुरुंना निवेदन देण्यात आले

By

Published : Nov 11, 2019, 4:51 PM IST

Updated : Nov 11, 2019, 6:34 PM IST

अमरावती - पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंबंधीचे निवेदन संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना देण्यात आले.

अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्याची प्रतिक्रिया

अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे यावर्षीचे आर्थिक गणीत कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण अमरावती विभागात शेती अरिष्टात सापडली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुल्क माफीची मागणी केली आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे असे या निवेदनात म्हटले आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने काय निर्णय घेतला याची माहिती समजू शकली नाही

Last Updated : Nov 11, 2019, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details