महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या मुलाखती; अमरावतीतून सुलभा खोडके, तर मोर्शीत हर्षवर्धन देशमुखांची दावेदारी - आमदार सुलभा खोडके

अमरावतीतील पंचवटी चौक येथील वऱ्हाडे सभागृहात आज मुलाखत प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सर्व आठही मतदार संघात उमेदवारीसाठी चुरस दिसून आली. आज अतिशय चांगल्या वातावरणात मुलाखत प्रक्रिया पार पडली असल्याचे अनिल देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या मुलाखती

By

Published : Jul 25, 2019, 11:39 PM IST

अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण गुजराथी आणि अनिल देशमुख यांनी अमरावती जिल्ह्यातील ८ मतदार संघातील एकूण 127 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अमरावती मतदार संघात माजी आमदार सुलभा खोडके, मोर्शीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि मेळघाट मतदार संघासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दावेदारी ठोकली आहे.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या मुलाखती

शहरातील पंचवटी चौक येथील वऱ्हाडे सभागृहात आज मुलाखत प्रक्रिया पार पडली. अमरावती मतदार संघासाठी बदनेराच्या माजी आमदार सुलभा खोडके यांच्यासह मिराज खान पठाण, डॉ. गनेश खारकर यांनी मुलाखत दिली. बडनेरा मतदार संघासाठी विनेश आडतीया, प्रमोद इंगोले, मेघशाम भोगे, योगेश कावरे, धामणगाव रेल्वे मतदार संघासाठी शरद देवरणकर, विनोद तलावरे, विनोद काळमेघ, विजय भैसे, जावेद पठाण, आचालपूरसाठी पक्षाच्या महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष संगीता ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, माजी आमदार वसुधा ठाकरे, हेमंत देशमुख, आबीद हुसैन, प्रदीप खडके, विजय काळे यांनी मुलाखत दिली.

मेळघाट मतदार संघासाठी माजी आमदार राजकुमार पटेल, अमरावती महानगरपालिकेचे लेखापरीक्षक राम चव्हाण, दर्यापूरसाठी इंदू सोमनाथ, संतोष कोल्हे, साहेबराव दामोदर, तिवसा मतदार संघासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, भारत शरद तसरे, बाबुराव बेलसरे, अरुणा खारकर यांनी मुलाखती दिल्या. मोर्शी मतदार संघासाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख इच्छूक आहेत. आज इच्छुकांप्रमाणे मुलाखत दिली नसली तरी अरुण गुजराथी आणि अनिल देशमुख यांची वैयक्तिक चर्चा केली.

अमरावती जिल्ह्यातील सर्व आठही मतदार संघात उमेदवारीसाठी चुरस दिसून आली. आज अतिशय चांगल्या वातावरणात मुलाखत प्रक्रिया पार पडली असल्याचे अनिल देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

दिल्ली आणि मुंबईच्या पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. आज अमरावतीत बैठक घेतल्यावर मुंबईत मतदारसंघ आणि उमेदवाराच्या नावावर चर्चा करून उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे अरुण गुजराथी यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, वसुधा देशमुख, गणेश खारकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details