अमरावती- नवनीत राणा तुम्ही लाखो अमरावतीकरांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर तुम्ही आता खासदारकीचा राजीनामा द्या, आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेले जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी हा सल्ला दिला आहे.
'नवनीत राणा तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अवमान केला' - शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ
'नवनीत राणा अभिनय क्षेत्रात रिटेक वर रीटेक देऊन एखादा सिन परफेक्ट करता येईल. पण अमरावतीची जनता तुम्हाला आता रीटेकची संधी देणार नाही. आपण अमरावतीच्या लाखो जनतेचा अपमान तर केलाच आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा देखील अपमान केला आहे', अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात हा अनुसूचित जाती साठी राखीव आहे. पण खासदार नवनीत राणा यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून त्यांनी ही खासदारकी जिंकली. दरम्यान उच्च न्यायालयाने निर्णय देत त्यांचे जात वैधता प्रमानपत्र रद्द केले आहे. 'नवनीत राणा अभिनय क्षेत्रात रिटेक वर रीटेक देऊन एखादा सिन परफेक्ट करता येईल. पण अमरावतीची जनता तुम्हाला आता रीटेकची संधी देणार नाही. आपण अमरावतीच्या लाखो जनतेचा अपमान तर केलाच आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा देखील अपमान केला आहे', अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण काय?
2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसचित जातीसाठी राखीव होता. या मतदारसंघाचे नेतृत्त्व तत्कालीन शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ करत होते. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. मात्र नवनीत राणांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांनी कोर्टाचे दार ठोठावले होते. अखेर न्यायालयाने मंगळवारी नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवत त्यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला. नवनीत राणा अपक्ष लढल्या असल्या तरी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, याआधी 2014 च्या लोकसभेत त्यांना राष्ट्रवादीने खासदारकीचं तिकीट दिले होते, मात्र तेव्हा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांनी त्यांना पराभूत केले होते. मात्र, आता खासदार राणा या भाजपाशी जवळीक साधून आहेत.
खासदार नवनीत राणा सातत्याने करतात शिवसेनेवर टीका
खासदार नवनीत राणा या मागील काही महिन्यांपासून सातत्याने शिवसेना आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करून त्यांच्यावर राज्यातील प्रश्नांवरून टीकेची झोड उठवत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यावरुन देखील खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.