अमरावती - अमरावती लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पती आमदार रवि राणा यांच्यासह लक्ष्मीनारायण नगरस्थित श्रीराम प्राथमिक शाळेत मतदान केले.
अमरावती : नवनीत राणा यांनी पती आमदार रवि राणा यांच्यासह केले मतदान - ncp
आमदार रवि रणा हे माझ्यासाठी लकी आहेत असे म्हणत नवनीत राणा यांनी आमदार रवि राणा यांना आधी मतदान करण्यास सांगितले.
नवनीत राणा यांनी केले मतदान
नवनीत राणा या ९.३० ला मतदान केंद्रावर पोहोचल्या. मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगेत राणा दाम्पत्य उभे होते. आमदार रवि रणा हे माझ्यासाठी लकी आहेत असे म्हणत नवनीत राणा यांनी आमदार रवि राणा यांना आधी मतदान करण्यास सांगितले. अमरावतीकर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येत मतदानासाठी घरबाहेर पडावे, असे आवाहन यावेळी नवनीत राणा यांनी केले.