महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुख्मिणीच्या माहेरघरातील कुलस्वामिनी अंबिकादेवीला ११५१ अखंड ज्योतीचा संकल्प - navratri special kaundanyapur 2019

अंबिका देवीवर रुख्मिणीची असीम भक्ती असल्यामुळे नवरात्रीत येथे दिवसातून ४ वेळा आरती केल्या जातात. दरवर्षी नवरात्रीनिमीत्त अंबिकेच्या संकल्पासाठी ९ दिवसात २४ तास अखंड ज्योती लावण्यात येत असतात. यावेळेस यावर्षी मंदिरात ११५१ अखंड ज्योती लावण्यात आल्या आहेत.

११५१ अखंड ज्योतींचा संकल्प

By

Published : Oct 6, 2019, 10:49 AM IST

अमरावती - विदर्भातील रुख्मिणीचे माहेरघर समजले जाणारे तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शनिवारी सकाळी घटस्थापनेपासून अश्विन शारदिय नवरात्रौत्सवाला सुरु झाली. यानिमीत्ताने मंदिरात अंबिकेच्या संकल्पासाठी अखंड ज्योती लावण्यात येत असते. यावर्षी मंदिरात ११५१ अखंड ज्योती लावण्यात आल्या आहेत.

११५१ अखंड ज्योतींचा संकल्प

विदर्भातील भीमक राजाची राजधानी तसेच रुख्मिणीचे माहेरघर म्हणून कौंडण्यपूर शहराची ओळख आहे. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात कौंडण्यापूरच्या अंबिका देवीचा उल्लेख आहे. भीमक राजाच्या नगरीतील हे मंदिर पुरातन काळापासून आहे. भीमक राजाच्या आधी येथे ५ राण्या होऊन गेल्या आणि त्यांच्याच काळात अंबिकेचे हे मंदिर उभारले गेले असे म्हणतात. याच मंदिरातून रुख्मिणीने वासुदेव ब्राह्मन्हाच्या हातानी द्वारकेला पत्र पाठविले होते. ते पत्र श्रीकृष्णाच्या हाती गेल्यावर तो ताबडतोब रथमार्गे कोंडण्यापुरात दाखल झाला. रुख्मिणीला तीच्या लग्नाची हळद लागली असताना प्रथेनुसार अंबिकेचे दर्शन घेण्याकरता ती मंदिरात आली. त्याचवेळेस श्रीकृष्णाने या मंदिरातून अंबिकेच्या साक्षीने रुख्मिणीचे हरण केले अशी आख्यायिका आहे.

हेही वाचा - अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ...
अंबिका देवीवर रुख्मिणीची असीम भक्ती असल्यामुळे नवरात्रीत येथे दिवसातून ४ वेळा आरती केल्या जाते. पहाटे ४ पासून ते रात्री ११ पर्यंत येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. सकाळची आरती ५.३० ला होत असून रोज अभिषेक करून भाविकांसाठी ८.३० ला महापूजा आरती केल्या जाते. १२ वाजता नेवैद्य आरती, नंतर रात्री ७.३० ला शेवटची आरती होत असते. अंबीकेच्या संकल्पासाठी येथे दरवर्षी नवरात्रीला ९ दिवसात २४ तास अखंड ज्योती लावण्यात येत असतात. तसेच दरवेळेस या ज्योतींमध्ये वाढ होत असते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा

ABOUT THE AUTHOR

...view details