अमरावती- धामणगाव रेल्वे शहरातील माताजी देवस्थानाची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे. या देवस्थानात शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. ३५१ अखंड दीप ज्योत प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांसह नवकन्या भोज उपक्रम अंतर्गत जवळपास ५०० कंपन्यांना भोजन देण्यात येत आहे.
अमरावतीच्या धामणगावातील माताजी देवस्थानात नवरात्रोत्सवाचा जागर - माताजी देवस्थान
माताजी देवस्थानाची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे. भाविकांची घटस्थापनेपासून दर्शनासाठी गर्दी होत आहे. या देवस्थानात वर्षातून दोनवेळा मोठे उत्सव साजरे करण्यात येतात.
हेही वाचा-ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?
येथील माताजी देवस्थानाची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे. भाविकांची घटस्थापनेपासून दर्शनासाठी गर्दी होत आहे. या देवस्थानात वर्षातून दोनवेळा मोठे उत्सव साजरे करण्यात येतात. यामध्ये चैत्रोत्सव आणि दुसरा शारदीय नवरात्रोत्सव. या दोन्ही उत्सवाच्या वेळी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यावेळी देवस्थान परिसर भावीक भक्तांच्या गर्दीने फुलून येतो. भाविक दररोज पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शनास गर्दी करतात. नवरात्रोत्सव काळात सकाळ व संध्याकाळी महाआरती, अभिषेख, महापूजा यासह विविध कार्यक्रम होत आहेत. माताजी देवस्थानात ३५१ अखंड ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. दरम्यान ९ दिवस नवकन्या भोज अंतर्गत जवळपास ५०० कन्यांना भोजन देण्यात येत आहे. या धार्मिक उत्सवाच्या यशस्वीतेकरिता देवस्थानाचे पुजारी पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनात भाविक भक्त कर्तव्य बजावत आहेत.