महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवनीत राणा यांनी मेळघाटातील धुळघाट रेल्वे स्टेशनची केली पाहणी - amravati breaking news

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाट दौऱ्यावर असतांना त्यांनी मेळघाटाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धुळघाट रेल्वे स्टेशनची रात्रीच्यावेळी पाहणी केली. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडलेला जुना ब्रिटिशकालीन मार्ग आहे.

Navneet Rana inspects Dhulghat railway station
नवनीत राणा यांनी धुळघाट रेल्वे स्टेशनची केली पाहणी

By

Published : Oct 11, 2020, 6:34 PM IST

अमरावती (मेळघाट)-अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांनी मेळघाटाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धुळघाट रेल्वे स्टेशनची रात्रीच्यावेळी पाहणी केली. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडलेला जुना ब्रिटिशकालीन मार्ग आहे. ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्यात येत असताना राजकीय अडचणीत हा मार्ग सापडला आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा रेल्वे मार्ग तयार केला जातोय. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास आदिवासी बाह्य लोकांशी संपर्क करू शकणार.

नवनीत राणा यांनी धुळघाट रेल्वे स्टेशनची केली पाहणी
धुळघाट रेल्वे स्टेशन हे अमरावती पासून १९० किमी अंतरावर आहे. व मध्यप्रदेशच्या सीमेवर असणारे अतिदुर्गम गाव म्हणजे धुळघाट रेल्वे आहे. अकोला, अकोट, डाबका, धुळघाट, खंडवामार्गे जाणारी रेल्वे येथील आदिवासींच्या दळणवळणाचे एकमेव साधन आहे. केवळ 10 रुपयात आदिवासी या रेल्वेने प्रवास करून अकोट-देडतलाई आदी ठिकाणी जाऊन आपला बाजार करून परतत होते.

5 वर्षांपूर्वी ब्रॉडगेज करण्याच्या नावाखाली हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला. तेव्हापासून या लोकांना धारणी,अकोट अकोला किंवा खंडवा या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी साधन उपलब्ध नाही. पूर्वी जेथे 10 रुपयात काम व्हायचे आता तेथे छोट्या-छोट्या कामासाठी तालुका मुख्यालय धारणी जाण्यासाठी 200 रुपये खर्च करावा लागतो. दरम्यान आता हा रेल्वे मार्ग पुन्हा सुरू करून आदिवासींसाठी फायदाचा ठरणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details