अमरावती -येत्या २९ तारखेपासून देशभरात नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडीया नृत्याच्या धमाल कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्या जाते. त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र युवती, महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. येथील 'रचना नारी मंच'ने दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली. तसंच या प्रशिक्षणात सहभाग घेत त्यांनीही गरब्याच्या तालावर ठेका धरला.
अनेक महिलांनाही या दांडिया नृत्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.