महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजची परिस्थिती २०१४ पेक्षा वेगळी, अडसूळांना यावेळी पराभूत करणारच - नवनीत राणा

जिल्ह्याशी काही एक संबंध नसणाऱ्या अडसूळांना परत पाठवण्याचे ठरवले आहे, असे स्पष्ट करत यावेळी अडसूळांना पराभूत करूच असा निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

नवनीत राणा

By

Published : Mar 16, 2019, 10:45 PM IST

अमरावती - पंतप्रधान मोदी यांची सभा अमरावतीत झाली नसती, तर अडसूळ निवडूनच आले नसते. २०१४ मधील आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे. १० वर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी यावेळी जिल्ह्याशी काही एक संबंध नसणाऱ्या अडसूळांना परत पाठवण्याचे ठरविले आहे, असे स्पष्ट करत यावेळी अडसूळांना पराभूत करूचअसा निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

नवनीत राणा

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अमरावती मतदार संघात २०१४ मध्ये रंगलेल्या आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असाच सामना यावेळी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी जाहीर केली असतानाच नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

गेल्या वर्षी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांना युवास्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या युवास्वाभिमान पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शरद पवार आणि अजित पवार यांना केली. आमची विनंती शरद पवारांनी मान्य केली असून येत्या ३ -४ दिवसात आघाडीची उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर होईल, असे नवनीत राणा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना स्पष्ट केले.प्रतिस्पर्धी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, खरे तर विधानसभा निवडणुकीत खासदार अडसूळ त्यांच्या मुलाचे दर्यापूर मतदार संघात डिपॉझिटही वाचवू शकले नाही. जिल्ह्यात ६ विधानसभा मतदार संघ असून एकाही ठिकाणी अडसूळ त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणू शकले नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिकेतही त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची संख्य नगण्य आहे.

गेली ५ वर्षे भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने त्यांच्या पोस्टरवरून मोदींचे फोटो काढून टाकले होते. आता युती होताच बाळ ठाकरे यांच्या जागी मोदींचे फोटो हे लावत आहेत. यावरून त्यांची मानसिकता काम करण्यापेक्षा पोस्टरबाजीद्वारे मत मागण्याची अधिक असल्याचे दिसून येते, असेही राणा म्हणाल्या. यावेळी मी किंवा माझे कार्यकर्ते नाही, तर मतदान करणारा मतदार ज्या व्यक्तीचे अमरावतीशी नाते नाही, ज्यांचे अमरावतीत घर नाही अशा व्यक्तीला अमरावती जिल्ह्याबाहेर पाठवणार, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details