अमरावती: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर प्रचंड अत्याचार केला. आमच्यावर झालेला अत्याचार आम्ही सहन करू शकतो. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे घरात गप्प बसून होते. आम्ही महाराष्ट्रावर आलेले संकट टाळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करावे अशी विनंती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्ष ज्या हिंदुत्वासाठी लढा दिला त्या हिंदुत्वाला बाजूला सारले. उद्धव ठाकरे यांना स्वतःचे घर देखील सांभाळता येत नाही. त्यांना त्यांचे 40 आमदार सांभाळता आले नाही असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावला. तसेच हिंदुत्वाचा विसर पडलेल्या उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा होईल, त्या त्या सर्व ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा पठण करत शुद्धीकरण करू असे देखील खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
व्यक्त केल्या भावणिक आठवणी : हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी कारागृहातील अनुभव सांगत. वातावरण हळवे बनवले त्या म्हणाल्या हनुमान चालीसा पठण केल्यामुळे थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आम्हाला 14 दिवस कारागृहात डांबण्यात आले. इतरांना चार वेळा पाणी दिले जायचे, मला मात्र एकच वेळा पाणी द्यायचे, वरून आदेश असल्याचे कर्मचारी सांगायचे. मला मानेचा त्रास झाला. रुग्णालयात दाखल करावे लागले. माझी लहान मुले मला त्यावेळी असे का असे प्रश्न विचारायची. अमरावतीत अकरा वेळा हनुमान चालीसा पठण केल्यानंतर त्यांनी हनुमान भक्तांशी संवाद साधकांना हनुमान चालीसा घटने मागील उद्देश स्पष्ट केला.