कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे रखडला रेल्वे वॅगन कारखाना; खासदार नवनीत राणा यांचा आरोप - Badnera Wagon Repair Workshop
बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे (Navneet Rana on Railway Wagon Factory ) काम रखडले आहे. हा मुद्दा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत उपस्थित केला.
अमरावती - अमरावती जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे (Railway Wagon Factory ) काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी 2018 मध्ये मंजुरी मिळाल्यावर प्रेमको रेल इंडिया इंजिनिअरिंग कंपनीला 163 कोटी रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण झाले नसून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी (Navneet Rana on Railway Wagon Factory ) केली आहे. याबाबत त्यांनी लोकसभेतही मुद्दा उपस्थित करून अमरावती जिल्ह्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना त्वरित उभारावा अशी मागणी केली आहे.