अमरावती - गुढीपाडव्याच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर आमदार रवी राणा यांनी गो कोरोना गो कोरोना म्हणत या कोरोना व्हायरस विरोधात आपण एकत्र येऊन लढूया असे आवाहनही केले.
'कोरोना गो' म्हणत राणा दाम्पत्याने उभारली नव्या वर्षाची गुढी... - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा
गुढीपाडाव्याच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गो कोरोना गो म्हणत या कोरोना व्हायरस विरोधात आपण एकत्र येऊन लढूया असे आवाहन केले.
!['कोरोना गो' म्हणत राणा दाम्पत्याने उभारली नव्या वर्षाची गुढी... Navaneet and Ravi Rana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6548355-756-6548355-1585209557255.jpg)
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आज त्यांच्या घरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली. यावेळी राणा दाम्पत्याने नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या सावटामुळे घरा बाहेर न पडता सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आपण कोरोनाला हरवू शकतो असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.