महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

National Saints Conference : अचलपुरात राष्ट्रीय संत संमेलन, देशभरातील 767 येणार

अचलपूर येथे ( Sant Sammelan at Achalpur ) होणाऱ्या राष्ट्रीय संत संमेलनाकरिता देशभरातील विविध पंथातील साधुसंत उपस्थित राहणार आहेत. कुंडात्मक एकादशी महायज्ञ, राष्ट्रीय संत संमेलनाचे ( National Saints Conference ) आयोजन अमरावती जिल्ह्याती अचलपूर येथे करण्यात ( Sant Sammelan at Achalpur in Amravati District ) आले आहे.

By

Published : Nov 26, 2022, 9:49 PM IST

Updated : Nov 26, 2022, 10:03 PM IST

National Saints Conference
National Saints Conference

अमरावती - जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे ( Sant Sammelan at Achalpur ) कुंडात्मक एकादशी महायज्ञ, राष्ट्रीय संत संमेलनाचे ( National Saints Conference ) आयोजन करण्यात आले आहे. मंगळावर पासून सुरू होणाऱ्या या राष्ट्रीय संत संमेलनाकरिता हिमाचल प्रदेशापासून तर कन्याकुमारी पर्यंत देशभरातील शंकराचार्य महामंडलेश्वर आचार्यासह विविध पंथातील साधुसंत उपस्थित ( Sant Sammelan at Achalpur in Amravati District ) राहणार आहेत.

अचलपुरात राष्ट्रीय संत संमेलन

अशी आहे व्यवस्था -अचलपूर येथील सुलतानपुरा परिसरात असलेल्या बालाजी मंदिराच्या पटांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. या ठिकाणी पाच भव्य मंडप उभारण्यात आले आहे. यामध्ये संत सभागृह पाकगृह, संत, गृहस्थ यांची वेगळी भोजन व्यवस्था, स्वच्छतागृह पाण्याची व्यवस्था यासह बाहेरगावावरून येणाऱ्या भक्त, संतांसाठी निवासाची व्यवस्था सुद्धा उभारण्यात आली आहे. या सप्ताहात देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीत भजन कीर्तन नामस्मरण, आध्यात्मिक प्रवचनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

इथून येथील संत -पश्चिम विदर्भाचा इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे संत संमेलन हे जिल्ह्यातील अचलपूर येथे होत आहे. या राष्ट्रीय संत संमेलनात हिमालयापासून तर, कन्याकुमारी पर्यंत अनेक संत मठाधिपती. आचार्य महामंडलेश्वर, जगद्गुरु येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रमुख हिमाचल प्रदेशातील संत विष्णुदास महाराज यांनी दिली.

रोज हजारो लोकांना मिळणार महाप्रसाद -या राष्ट्रीय संत परिषदेसाठी पश्चिम विदर्भातील अनेक भाविक भक्त उपस्थिती लावणार आहे. त्यांच्यासाठी अन्नछत्र उभारण्यात आले असून यामध्ये सेवेकरी, दर्शन, आरती या दोन्ही भाविकांसाठी महाप्रसादाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कांदा, लसूण वर्ज करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक तयार करण्यात येणार आहे. जेवन बनवण्याकरीता पाच महत्त्वाचे आचारी असून त्यांच्या हाताखाली सुमारे 35 ते 40 जण काम करत आहेत. या अन्नछत्रांमध्ये दान देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. तसेच आपल्या क्षमतेप्रमाणे डाळ, तांदूळ, तेल, तूप, पालेभाज्या, फळे या ठिकाणी अनेक भाविक आणून ठेवत असल्याची माहिती माध्यम समन्वयक प्रमोद नैकेले यांनी दिली आहे.


24 तास रामधून - राष्ट्रीय संत संमेलन, राम कथा दरम्यान सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी याकरिता या ठिकाणी दोन नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत अखंड राम धुन सुरू राहणार आहे. याकरिता देशभरातील आलेल्या साधुसंत, युवकांचे पंधरा लोकांचे तीन गट तयार करण्यात आले आहे. ही संत मंडळी कुठलीही खंड न पडू देता रामधून करणार आहे. यामध्ये श्रीराम सीता हनुमान या तिघांच्या चरित्रांचा उल्लेख करत रामनामाचा गजर या ठिकाणी होणार आहे.

Last Updated : Nov 26, 2022, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details