अमरावती : तृतीयपंथीयांचे राष्ट्रीय संमेलन १ जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत अमरावतीमध्ये होत (National Conference of transgender in Amravati) आहे. या संमेलनाकरिता देशभरातील तृतीयपंतांनी उपस्थित लावली आहे. देशभरातून 600 चे जवळपास तृतीयपंथीय शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्या एकूणच प्रश्नाबाबत आणि त्यांच्या लिंग भिन्नतेबाबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या विविध प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही लिंगे मिळून तृतीयपंथी जन्माला येत असल्याचे नेहा नायक आणि त्यांच्या सहकारी यांनी सांगितले. आम्ही ट्रान्सजेंडर नाही तर आम्ही किन्नर (What Is Transgender) आहोत. भगवद्गीता आणि वाल्मिकी यांच्या पुस्तकात सुद्धा तृतीयपंथीयांचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
लैंगिक जडण घडण : स्त्री व पुरुष या लिंगा व्यतिरीक्त आणि एक लिंग म्हणजे उभयलिंग होय. त्या दोन्हीमधील लैंगिक जडण घडण असेल, तर त्या व्यक्तीला लोक तृतीयपंथी म्हणतात. तृतीयपंथीय जन्माला येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे अशी आहेत, गुणसूत्रे हे एक मोठे कारण आहे. पुरुष प्रजनन विकास संस्थेवर अवलंबून आहे. जर पुरुष लिंग प्रबळ आहे, तर त्याला हिजडा म्हणतात. स्त्री लिंग प्रबळ असेल तर त्या जनाना म्हणतात. काही वेळा स्त्री लिंग प्रबळ असेल, तर खऱ्या स्त्रीपेक्षा जनाना सुंदर (National Conference of transgender) दिसतात.