अमरावतीNana Patole On Rahul Gandhi: कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देशातील लोकांचा विश्वास वाढतो आहे. सोशल मीडियावर असो किंवा वैयक्तिक पातळीवर लोकांच्या राहुल गांधींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांची देशातच नव्हे तर परदेशात देखील क्रेझ (Rahul Gandhi craze) आहे. हे सारं काही करण्यासाठी त्यांना कुठले खोटे किंवा नकली (Nana Patole Amravati Tour) इव्हेंट करण्याची गरज नाही. (Congress Worker Review Meeting) अशा नकली इव्हेंटशिवाय देखील त्यांची सर्वत्र क्रेझ असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज (बुधवारी) अमरावतीत म्हणाले. (Nana Patole PC Amaravati) येथे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वतंत्र आढावा बैठक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (बुधवारी) अमरावती येथील काँग्रेस भवनात घेतली. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.
शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी बाध्य करणारं सरकार :राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी सरकारला काहीही घेणं देणं नाही. सध्या राज्यात कॉमेडी सरकार सुरू आहे. यामध्ये पालकमंत्री पदावरून देखील भांडणं होत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा बिनाकामाच्या विषयांवरच या सरकारमधील लोक बोलत आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील शेतीची परिस्थिती बिकट आहे. पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ सर्वच भागात शेतकरी अडचणीत आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे आणि अनेक रोग असल्यामुळे कापूस आणि तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातलं झोपी गेलेलं आणि भ्रष्टाचारी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी बाध्य करीत आहेत, असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला.
सरकारकडून जनतेची लूट :आता निवडणुका समोर आल्यामुळे केंद्र शासनाने गॅस सिलेंडरचे दर हे 300 रुपयांनी कमी केले आहे. मुळात गॅस सिलेंडर तसंच पेट्रोल, डिझेल यांच्या माध्यमातून सरकार जनतेची आर्थिक लूट करत आहेत. गॅस सिलेंडरवर जे काही तीनशे रुपये या सरकारने कमी केले आहे खरं तर आतापर्यंत कुठलेही कारण नसताना या सरकारने गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये लुटण्याचे काम केले असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले.