अमरावती- महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे-हजार रुपये रोजगार देऊन लोकांची गर्दी केली. आम्हीही यात्रा काढत आहोत मात्र, कुठेही लोकांना पैसे देऊन गर्दी केली नाही, अशी खोचक टीका काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. काँग्रसने आजपासून पर्दाफाश यात्रेला अमरावतीमधून सुरुवात केली आहे, यावेळी ते बोलत होते.
भाजप सरकारचा निश्चितच 'पर्दाफाश' होईल - नाना पटोले - पर्दाफाश यात्रा
भाजप सरकारच्या विरोधात काढलेल्या पर्दाफाश यात्रेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची सुरुवात आम्ही अंबानगरीतून केली आहे, गाडगेबाबा आणि तुकडोजींची ही भूमी आहे. त्यामुळे भाजप सरकारचा पर्दाफाश निश्चितच होईल.

नाना पटोले
नाना पटोले
भाजप सरकारच्या विरोधात काढलेल्या पर्दाफाश यात्रेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची सुरुवात आम्ही अंबानगरीतून केली आहे, गाडगेबाबा आणि तुकडोजींची ही भूमी आहे. त्यामुळे भाजप सरकारचा पर्दाफाश निश्चीतच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.