Nagar Panchayat Elections 2022 : अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसचे तर भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचे वर्चस्व - Nagar Panchayat Elections 2022
अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायत निवडणुकीचे (Nagar Panchayat Elections 2022) सर्व निकाल हाती आले आहेत. एकूण 17 जागापैकी 12 जागा जिंकून काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत येथे भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी समाधानकारक राहिली असून 4 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर वंचितने खाते उघडत 1 जागेवर विजय मिळवला आहे.
अमरावती -अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायत (Nagar Panchayat Elections 2022) निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले आहेत. एकूण 17 जागापैकी 12 जागा जिंकून काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत येथे भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी समाधानकारक राहिली असून 4 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर वंचितने खाते उघडत 1 जागेवर विजय मिळवला आहे. तिवसा मधील या निकालाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बळ मिळाले आहे.