महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरीय जम्बो कोविड सेंटर उभारणार- मुख्यमंत्री - Maze kutumb mazi jababdari

अमरावती- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढे गरज पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Sep 27, 2020, 8:46 AM IST

अमरावती- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढे गरज पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये करावयाच्या जनजागृतीबाबत आदीबाबत त्यांनी माहिती घेतली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी अनेक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कार्य करीत आहे. राज्यस्तरावरही या मोहिमे अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील नो मास्क, नो सवारी' या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत तरी प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे सैनिक होऊन कोरोनाविरुद्ध लढावे लागेल. शासनालाही आरोग्यविषयक सुविधा निर्माण करताना सीमारेषा आखावी लागेल. तसेच आवश्यक असलेल्या औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्यावे लागेल. सध्यातरी कोरोनाची लस उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. या लसी उपलब्ध झाल्यानंतरही त्याची परिणामकारकता किती असेल याबाबतही चर्चा होत आहे. तसेच लसीकरणाची मोहीम किती वेळ चालेल, याबाबतही विचार करावा लागणार आहे.

कोरोनाविरूद्धच्या या मोहिमेत आता प्रत्येक नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागेल. मास्क, हात धुणे, अंतर राखणे यामुळे कोरोनाच्या प्रसाराला शाळा घालण्यास मदत होत आहे. त्यामुळे या त्रिसूत्रीचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा. नागरिकांना समजेल अश्या बोली भाषा आणि स्थानिक लोककलावंताच्या मदतीने ही मोहीम गावागावात पोहोचता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरिक्षक कृष्णकुमार मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details