अमरावती - शहरातील शेगाव नाका परिसरात मटण विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शेगाव नाका परिसरात मटन विक्री करणारा व्यक्ती रतनगड परिसरातील रहिवासी आहे. 11 मेपासून अमरावती शहरात चांगलीच गर्दी वाढली असून मटन खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले.
मटन विक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे शेगाव नाका परिसरात खळबळ - अमरावती मटन विक्रेत्याला कोरोना
मटन विक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी शेगाव नाकासह लगतच्या परिसरातील ज्या नागरिकांनी या मटन विक्रेत्याकडून गेल्या आठ-पंधरा दिवसात मटन खरेदी केले, त्या सगळ्यांनी स्वतःची आरोग्य चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेगाव नाका परिसरात मटण विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून गाडगेनगर या भागातील अनेकांनी मटण खरेदी केले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, मटन विक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी शेगाव नाकासह लगतच्या परिसरातील ज्या नागरिकांनी या मटन विक्रेत्याकडून गेल्या आठ-पंधरा दिवसात मटन खरेदी केले, त्या सगळ्यांनी स्वतःची आरोग्य चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मटन विक्रेत्याकडून ज्यांनी मटन खरेदी केले, त्यांनी त्वरित रुग्णालयात पोहोचून माहिती द्यावी आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गाडगेनगर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.