मुस्लिम विद्यार्थ्याने संस्कृतमध्ये मिळवले चक्क पैकीच्या पैकी गुण - ssc result 2020
धामनगाव रेल्वे येथील सेठ फत्तेलाल लाफचंद सेफला महाविद्यालयात शिकलेल्या मुशर्रफ सय्यद अली या विद्यार्थ्याने संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्याचे खूप कौतुक केले जात आहे.
अमरावती -बुधवारी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, गणित, हिंदी आदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. मात्र, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मधील एका मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याने 'संस्कृत' विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. मुशर्रफ सय्यद अली असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो धामनगाव रेल्वे येथील सेठ फत्तेलाल लाफचंद सेफला महाविद्यालयात शिक्षण घेतो. शहरातील शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या मुशर्रफची परिस्थिती बेताचीच आहे. तसेच त्याने दहावीत ९५ टक्के मिळवल्यामुळे त्याचे परिसरामध्ये कौतुक केले जात आहे.