महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावता; मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या तीन तलाक तसेच आर्टिकल 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खासदार नवनीत राणा यांनी संसदेत समर्थन करणे आम्हाला पटले नसून, विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत असणार नाही, या शब्दांत आमदार रवी राणा यांच्याविरोधात स्थानिक मुस्लीम समुदायाने रोष व्यक्त केला आहे.

मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल

By

Published : Oct 8, 2019, 3:18 PM IST

अमरावती - मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या तीन तलाक तसेच आर्टिकल 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खासदार नवनीत राणा यांनी संसदेत समर्थन करणे आम्हाला पटले नसून, विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत असणार नाही, या शब्दांत आमदार रवी राणा यांच्याविरोधात स्थानिक मुस्लीम समुदायाने रोष व्यक्त केला आहे. विरोधी पक्षातील सर्व सदस्य सभात्याग करून बाहेर गेल्यानंतर नवनीत राणांनी संसदेत मोदींची स्तुती केल्याने यंदा निवडणुकीत पाठिंबा देणार नसल्याचे या समाजातर्फे सांगण्यात आले.

मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल

बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा असणारे अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. सोमवारी प्रचारादरम्यान बडनेरा येथील मुस्लीम वस्तीत ते प्रचारासाठी गेल्यानंतर मुस्लीम समाजातील नेत्यांनी त्यांना घेराव घातला.

हेही वाचामुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा

'तीन तलाक'वर नवनीत राणा यांनी सरकारचे समर्थन केल्याने आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत, आम्ही तुम्हाला कसे मत द्यावे, असा प्रश्न या नेत्यांनी उपस्थित केला. नवनीत राणा यांना आम्ही मतदान केले. तुम्हाला आमच्या हृदयात स्थान दिले आणि तुम्ही आमच्या हृदयातच खंजीर खुपसत आहात, हे योग्य नाही. असे यावेळी मुस्लीम नेते म्हणाले.

आता आमची माफी मागण्याऐवजी प्रसारमाध्यमांमध्ये सलग तीन दिवस तुमच्या कृत्याबाबत तुम्ही खेद व्यक्त करा आणि नंतरच आमच्याकडे मत मागण्यासाठी या, असा सल्लाही मुस्लीम नेत्यांनी रवी राणा यांना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details