महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे खरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत - corona news in amravai

खरबूज पीकाला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र बंद पुकारण्यात आल्याने खरबूज विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

musk Melon growers worried due to effect of Corona
कोरोनामुळे खरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत

By

Published : Apr 3, 2020, 9:08 AM IST

अमरावती - सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. या काळात तापमान ५० च्या वर पोहचते. अश्यावेळी सी जीवनसत्त्वची गरज सर्वाधिक असते. त्यामुळे विदर्भातील शेतकरी टरबूज, खरबूज अशा फळपिकांची लागवड करतात. याला बाजरपेठेत मागणी देखील जास्त आहे. मात्र, सध्याच्या काळात जगभरात कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. महाराष्ट्रासह देशभरात या विषाणूच्या रुग्णाची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसाचा लॉकडाउन केला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेऊन घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. याचा परिणाम अमरावती जिल्ह्यातील चिंचपूर येथील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

खरबूज पीकाला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र बंद पुकारण्यात आल्याने खरबूज विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नाशवंत असलेलं खरबूज आता खराब होण्याच्या मार्गावर आहे.

अमरावती जिल्हयातील चिंचपूर येथील रहिवासी प्रफुल्ल गायकवाड या युवा शेतकऱ्याने या वर्षी ३ एकर शेतात खरबूज आणि २ एक्कर शेतात काकडी लागवड केली. एकीकडे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर देखील काढणीला आलेलं पीक बाजारपेठेत कसे न्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

एकीकडे शासनाने परिपत्रक काढून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यास मनाई नाही असे सांगितले आहे. मात्र, तरीही पोलीस शेतकऱ्यांचा शेतमाल अडवून परतून लावत आहेत, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details