अमरावती - महाराष्ट्रात अनेक पुरातन ठिकाणे आहेत, ज्याचं आजही जतन केलं जातं आहे. अनेक पुरातन वास्तू सोबतच पुरातन विहिरीदेखील आहेत. ज्या विहरींच्या आतमध्ये नक्षीकाम केले आहेत, अशा विहरी आजही महाराष्ट्रात आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पवनी गावात राहणारे ( 18th century Well In Amravati ) गोपाळराव सातपुते यांच्या शेतातदेखील अशीच एक मुघलकालीन विहीर आहे. ज्या विहरीला बारा दरवाजे आणि खिडक्या ( Amravati 12 Door Well ) आहेत. त्यामुळे या पुरातन विहरीला 'बाराद्वारी' विहीर म्हणून ओळखले जाते.
ही विहिर १८ व्या शतकातली? -
गोपाळ सातपुते यांनी त्यांच्या शेतात स्वखर्चाने ही विहिर बांधली आहे. १८ व्या शतकात मुघल काळात त्यांनी ही विहिर बांधली असावी, असा अंदाज येथील उपसरपंच बंडू गोळे यांनी वर्तवला आहे. विशेष बाब म्हणजे या विहरीत मध्यभागी एक मंदिरदेखील आहे. त्या मंदिराला घुंगट आहे. या मंदिरात देवदेवीतांच्या मूर्त्या सध्या नाहीत, त्या नामशेस झाल्याचा अंदाज आहे. किंबहूना गोपाळ सातपुते यांच्या मृत्यूनंतर त्या बसवण्याच्या राहल्या असाव्या, अस मतही व्यक्त केलं जात आहे.
विहरीवर राम-सीतासह आदी देवतांचे नक्षीकाम -
हल्ली इंजिनिअरच्या माध्यमातून घरांचे इमारतींचे बांधकाम केले जाते. परंतु त्या काळात कुठलेही इंजिनिअर नसताना आताच्या इंजिनिअरला लाजवेल, अशा पद्धतीने मजबूत असे बांधकाम मुघल काळात या विहरीचे झाले आहे. अगदी खरपाच्या बीमच्या माध्यमातून आधारदेखील बांधकाला दिला आहे. तसेच अष्टकोनी आकाराच्या या विहरिंवर प्रथमदर्शनी सुंदर असे नक्षीकाम केले आहे. ज्यामध्ये राम सीता, हनुमान, लक्षणसह आदी देवतांचे शिल्प कोरले आहेत. त्यामुळे या विहरीचे बांधकाम हे १८ व्या शतकातील असावे, असा अंदाज आहे.