अमरावती -जिल्ह्यातील परतवाडा शहरात खासगी बसचालकांनी राडा करून प्रतिस्पर्धी खासगी बसची तोडफाड केल्याने खळबळ उडाली. परतवाडा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली.
अशी आहे घटना

परतवाडा बस बस स्थानकासमोर नेहमीप्रमाणे खासगी बसची गर्दी आज सकाळीही होती. श्रीराम ट्रॅव्हल्सचे बसचालक आपली गाडी अमरावतीत नेत असताना जय बजरंग ट्रॅव्हल्सचे संचालक राजेश भोंडे आणि नीलेश भोंडे यांनी श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसमागे आपली बस उभी केली आणि त्या बसला समोर किंवा मागे जाणारा मार्ग बंद केला. यानंतर राजेश आणि नीलेश यांनी श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसवर हल्ला चढवून गाडीच्या काचा फोडून नासधूस केली. या प्रकरणात श्री राम ट्रॅव्हल्सच्या बसचे चालक शेख कलीम शेख रहीम यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
एस. टी. बसच्या फेऱ्या अर्धा तास खोळंबल्या
बसस्थानक परिसरात 200 मीटरपर्यंत खासगी वाहने लावण्यास बंदी असताना परतवाडा येथील बस स्थानकासमोर खासगी बस आणि काळी-पिवळी गाड्यांची गर्दी असते. आज सकाळी बस स्थानकासमोर खासगी बस फोडण्यात आल्यावर परतवाडा आगारातून बाहेर जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद झाला. या सर्व गोंधळात एस. टी. बसच्या फेऱ्या अर्धा तास खोळंबल्या.