अमरावती -जिल्ह्यातील सालोड येथे महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रतीक ढवळे, कनिष्ठ अभियंता संतोष शेंगोकर, प्रधान तंत्रज्ञ अमोल पवार, तंत्रज्ञ अहफाज खान फिरोज खान अशी मारहाण झालेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाणे अंतर्गत हा प्रकार घडला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण, अमरावतीतील प्रकार - मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाणे अमरावती
महावितरणचे चारही कर्मचारी वीज बिल थकीत ग्राहकाकडे बिल भरण्याच्या मागणी करिता गेले होते. यावेळी सय्यद जाकीर (रा. सलोड) यांच्याकडे 2460 रुपये वीज बिल भरण्याची विनंती केली. मात्र, सय्यद जाकीर, सय्यद तोतीफ, सय्यद सलीम, नसीमाबी सय्यद सादिक यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली.
![महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण, अमरावतीतील प्रकार MSEDCL workers beaten by some people in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5891260-thumbnail-3x2-mum.jpg)
हे चारही कर्मचारी सकाळी वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्राहकाकडे गेले होते. यावेळी सय्यद जाकीर (रा. सलोड) यांच्याकडे 2460 रुपये वीज बिल भरण्याची विनंती केली. मात्र, सय्यद जाकीर, सय्यद तोतीफ, सय्यद सलीम, नसीमाबी सय्यद सादिक यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. घटनेनंतर आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वायदंडे करीत आहे.
हेही वाचा -हळदी समारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू