अमरावती:चिखलदरा तालुक्यात अतिशय दुर्मिळ भागात वसलेल्या पाचडोंगरी गावात गुरुवारी अशुद्ध पाणी पिल्याने शंभरच्या वर पुरुष व महिलांना अतिसारची लागण झाली. आणि 3 नागरिकांचा मृत्यू (Death of tribals in Melghat) झाला. 'मेळघाटातील निष्पाप लोकांच्या मृत्त्युला महावितरणच जवाबदार (MSEDCL is responsible for the death of tribals) आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणी असलेला वीजपुरवठा खंडित केला नसता किंवा ग्राम सचिवाने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली असती. तर ३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला नसता',असा घनाघनीत आरोप जिल्हा परिषद चे माजी सभापती दयाराम काळे (The allegations were made by Dayaram Kale) यांनी केला आहे.
प्रशासनाने गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु कुणीच आपली जबाबदारी पार न पाडल्या ने पाचडोंगरी येथील तीन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमावला लागला. त्यामुळे जबाबदार असलेल्या महावितरणने मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी. अन्यथा महावितरण सह व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यां विरुद्ध पिडीत परिवाराला न्याय देण्यासाठी व दोषीं वर कारवाई करण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दयाराम काळे यांनी दिला आहे.