महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौंड्यणपूर रुक्मिणी माता मंदिरात काल्याच्या कीर्तनाला खासदार नवनीत राणांची उपस्थिती - Rukmini Mata Mandir

माता रुक्मिणी देवस्थानात ( Rukmini Mata Temple ) आयोजित काल्याचे किर्तनाला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) सहभागी झाल्या. यावेळी आपल्या धर्म,परंपरा जोपासून आपल्या देवीदेवतांचे मनोभावे पूजन केल्याने मानसिक,आध्यत्मिक शांती लाभते असे प्रिपादन केले.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Jul 15, 2022, 4:15 PM IST

अमरावती - विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र कौंड्यणपूर येथे माता रुक्मिणी देवस्थानात ( Rukmini Mata Temple ) आयोजित काल्याचे किर्तनाला खासदार नवनीत राणा सहभागी ( MP Navneet Rana ) झाल्या. यावेळी आपल्या धर्म व परंपरा जोपासून आपल्या देवीदेवतांचे मनोभावे पूजन करणे हेच आपल्या मानसिक,आध्यत्मिक शांतीसाठी ( spiritual peace ) उपयुक्त असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. राजराजेश्वर माऊली सरकार यांच्या उपस्थितीत या सोहळ्यात गोपाळकाला भाविकांना वितरित करण्यात आला. कार्यक्रमस्थळी हजारो भाविकांची गर्दी उसळी होती. खासदार नवनीत राणा यांनी स्वतः यावेळी प्रसाद वितरित केला.

खासदार नवनीत राणा

हेही वाचा -Devendra Fadnavis raj thackeray meeting: अमित ठाकरेंची राजकारणात एंन्ट्री?; देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची "शिवतीर्थावर" भेट


कौडण्यापूरचा सर्वांगीण विकास करणार -आपला धर्म आपली आस्था जोपासणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य असून धर्मरक्षणसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी खासदार नवनीत राणा म्हणल्या. श्री क्षेत्र कौडण्यापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरि प्रयत्न करणार असून आवश्यक तो निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या सुखासाठी विठ्ठलला साकडे -यावेळी सर्व भाविकभक्तांसोबत तल्लीन होऊन खासदार नवनीत रवी राणा यांनी कीर्तनाचा आनंद घेतला.यावेळी माता रुक्मिणी चरणी प्रार्थना करतांना खासदार नवनीत राणा यांनी यावर्षी समाधानकारक पाऊस पडून शेतकरी-शेतमजूर सुखी समृद्ध व्हावा व सर्व नागरिकांना सुख समृद्धी शांती लाभावी व सर्वांची प्रगती व्हावी असे साकडे घातले.

हेही वाचा -Maharashtra Breaking News : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याकरिता ईडीने मागितला वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details