महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana Birthday : हनुमान जयंतीनिमित्त नवनीत राणांनी केले हनुमान चालीसाचे पठण; राणांचा वाढदिवसही साजरा - Rana Birthday

हनुमान जयंतीनिमित्त नवनीत राणांनी आज अमरावतीत हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच त्यांनी 11 वेळा विविध सुरात हनुमान चालीसा म्हटला. त्याचबरोबर खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस असल्याने त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Navneet Rana Birthday
Rana Birthday

By

Published : Apr 6, 2023, 5:05 PM IST

राणांचा वाढदिवस साजरा

अमरावती :शहरात आज हनुमान जयंतीच्या पर्वावर खासदार नवनीत राणा यांनी सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. आज त्यांचादेखील वाढदिवस असल्यामुळे अकरावेळा विविध सुरात त्यांनी हनुमान चालीसा म्हटला. मुंबईतील शैलेंद्र भारती यांनी हॅपी बर्थडे नवनीत हे गाणे गायले. तसेच खासदार नवनीत राणांना सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हनुमान जयंती, वाढदिवस हा योगायोग :आज हनुमान जयंती आहे. त्यासोबतच माझा वाढदिवस देखील आहे. मात्र, हा केवळ योगायोग असल्याचे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. खासदार नवनीत राणा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी मोठ्या संख्येने आले होते.

चाहत्यांनी केली शुभेच्छा देण्यासाठी गर्दी :हनुमान चालीसा पठणानंतर खासदार नवनीत राणा यांना, महिला, युवती तसेच लहान मुलांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांनी प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत त्यांच्याशी संवाद साधला.

नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचे आरोप : खासदार नवनीत राणा यांच्याही दोन जन्मतारखा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. विशेष म्हणजे 6 एप्रिलला हनुमान जयंती आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवसही आजच आहे. खासदार नवनीत राणा यांच्या दाखल्यावर त्यांची जन्मतारीख 6 एप्रिल 1985 असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र शीख असल्याचे शिवसेनेचे नेते सुनिल खराटे यांनी म्हटले आहे.

जात प्रमाणपत्र बनावट :खासदार नवनीत राणा यांच्या एका टीसीवर जात शीख असल्याचा उल्लेख आहे तर, दुसरीकडे मोची जातीचा उल्लेख असल्याचे शिवसेना नेते सुनिल खराटे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राणा यांच्या जात प्रमाणपत्राला बनावट टीसी लावण्यात आला आहे. यामध्ये त्यांची जन्मतारीख 15 एप्रिल 1985 आहे. खासदार नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या अधारे लोकसभा निवडणूक लढवली असल्याचे खराटे म्हणाले. त्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राबाबत खुलासा करायला हवा अशी मागणी देखील खराटे यांनी केली आहे.


हेही वाचा - Hanuman Jayanti 2023: 105 फूट उंच हनुमान मूर्तीला चढवला रिमोटद्वारे दीड क्विंटल फुलांचा हार..

ABOUT THE AUTHOR

...view details