महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati To Pune Train : अमरावती ते पुणे नव्या रेल्वे गाडीला खासदार नवनीत राणांनी दाखवला हिरवा झेंडा - पुण्याला बारा तासात पोहोचणार

Amravati To Pune Train : अमरावती ते पुणे दरम्यान दोन गाड्या नियमित धावत असताना आता पुन्हा एका नव्या गाडीला खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी (13 नोव्हेंबर) रात्री 10:50 मिनिटाला हिरवा झेंडा दाखवला. ही नवी गाडी पूर्णतः चेअरकार असून अमरावतीकरांना पुण्यात जाण्यासाठी स्वस्त दरात विशेष सुविधा या गाडीच्या माध्यमातून आता उपलब्ध झाली आहे.

MP Navneet Rana flagged off the new train from Amravati to Pune
अमरावती ते पुणे नव्या रेल्वे गाडीला खासदार नवनीत राणांनी दाखवला हिरवा झेंडा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 11:37 AM IST

कमी दरातील हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा

अमरावती Amravati To Pune Train :अमरावतीवरुन पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहरातील अनेक युवक हे कामानिमित्तानं मोठ्या पुण्यात राहतात. यामुळं अमरावती-पुणे या गाडीला प्रचंड मागणी होती. याआधी अमरावती ते पुणे दरम्यान दोन गाड्या धावत असून त्या गाड्या अमरावती ते पुणे हे अंतर 16 तासात गाठतात. आता ही नवीन गाडी अमरावतीवरुन पुण्याला बारा तासात पोहोचणार आहे.

स्वस्त दरात प्रवास :अमरावतीवरुन पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्याहून अमरावतीला येण्यासाठी खासगी बस गाड्यांवरच प्रवाशांना अवलंबून राहावं लागतं. दिवाळीच्या काळात खासगी बस गाड्यांचे तिकीट दर तब्बल 5 हजार रुपयांपर्यंत वाढलेत. मात्र, आता ही नवी अमरावती-पुणे चेअरकार सुरू झाल्यामुळं प्रवाशांना अतिशय कमी दरात प्रवास करता येणार आहे. या गाडीच्या सामान्य बोगीचे दर हे प्रति व्यक्ती 215 रुपये इतके आहे. तर द्वितीय श्रेणी बोगीसाठी प्रति व्यक्ती 230 रुपयांसाठी 390 रुपये आणि एसी चेअरकारसाठी 850 तिकीट दर आकारण्यात आले आहेत. कमी दरातील हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचं खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

'या' शहरातील प्रवाशांना होणार फायदा :अमरावती-पुणे ही गाडी दिवाळीनिमित्त सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. ही गाडी अमरावती रेल्वे स्थानकावरून रोज रात्री 10:50 मिनिटांनी सुटणार आहे. ही रेल्वे पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल. तसंच पुण्यावरून ही गाडी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी निघणार असून अमरावतीला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी ती पोहोचेल. दरम्यान, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर,भुसावळ ,जळगाव ,पाचोरा ,काजगाव, चाळीसगाव, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, उरळी या रेल्वेस्थानकावर थांबणार असून या सर्व ठिकाणच्या प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा -

  1. पंढरपूरसाठी अमरावतीतून सुटली विशेष रेल्वे गाडी; नवनीत राणांच्या प्रयत्नामुळे गाडीला 3 अतिरिक्त डबे
  2. Pune Amravati Special Train : प्रवाशांची तारांबळ! पुणे-अमरावती विशेष रेल्वे ऐनवेळी झाली रद्द
  3. Vande Bharat Fare : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वंदे भारतसह इतर गाड्यांच्या भाड्यात होणार भरघोस कपात

ABOUT THE AUTHOR

...view details