महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana on Hanuman Chalisa : आम्ही दहशतवादी नाही तर शांततावादी लोकप्रतिनिधी आहोत - खासदार नवनीत राणा - हनुमान चालीसा मातोश्री नवनीत राणा प्रतिक्रिया

खासदार नवनीत राणा ( Navneet Rana news Amravati ) यांनी मुंबईत येऊन दाखवावे. त्या आपल्या पायावर येतील मात्र पायावर जाणार नाही, अशा स्वरुपाची धमकी आम्हाला ( Navneet Rana on Hanuman Chalisa at Matoshri ) शिवसैनिकांनी दिली आहे. मात्र, आम्ही कुणी दहशतवादी नाही, तर शांततावादी लोकप्रतिनिधी आहोत. राज्यात लागलेली साडेसाती सुटावी याच उद्देशाने येणाऱ्या शनिवारी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण आम्ही करणार आहोत, असे खासदार नवनीत राणा ( Navneet Rana on Hanuman Chalisa recitation ) म्हणाल्या.

Navneet Rana on Hanuman Chalisa
हनुमान चालीसा नवनीत राणा प्रतिक्रिया

By

Published : Apr 21, 2022, 1:44 PM IST

अमरावती -खासदार नवनीत राणा ( Navneet Rana news Amravati ) यांनी मुंबईत येऊन दाखवावे. त्या आपल्या पायावर येतील मात्र पायावर जाणार नाही, अशा स्वरुपाची धमकी आम्हाला ( Navneet Rana on Hanuman Chalisa at Matoshri ) शिवसैनिकांनी दिली आहे. मात्र, आम्ही कुणी दहशतवादी नाही, तर शांततावादी लोकप्रतिनिधी आहोत. राज्यात लागलेली साडेसाती सुटावी याच उद्देशाने येणाऱ्या शनिवारी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण आम्ही करणार आहोत. शिवसैनिक आम्हाला तारीख देतील याची वाट आम्ही पाहिली. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने आम्हीच आता मातोश्रीवर जाण्याची तारीख घोषित केली असल्याचे खासदार नवनीत राणा ( Navneet Rana on Hanuman Chalisa recitation ) 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.

माहिती देताना खासदार नवनीत राणा

हेही वाचा -Akansha Thakur Appeal To Anil Bonde : मामा, अमरावतीतल्या तरुणांना बिघडवू नका, यशोमती ठाकुरांच्या मुलीची अनिल बोंडेंना भावनिक साद

हनुमान चालीसाचा विरोध का? -हनुमान जयंतीच्या पर्वावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Hanuman Chalisa at Matoshri ) यांनी हनुमान चालीसा पठण करावे इतकी साधी विनंती आम्ही केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हनुमान जयंतीला कोणत्याही मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण केले नाही, कुठे आरतीही केली नाही. त्यांच्या या कृत्यामुळे ते आपली विचारधारा विसरले आहेत हे स्पष्ट होते. हनुमान चालीसाला मुख्यमंत्र्यांचा विरोध का आहे? असा सवाल देखील खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी अडविण्याचे कृत्य करू नये -2020 मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईला मातोश्रीवर जायला निघाले असताना पोलिसांनी त्यांना अडवले होते. यावेळी सुद्धा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर काय करणार? या प्रश्नावर खासदार नवनीत राणा यांनी, पोलिसांनी यावेळी आम्हाला अडविण्याचे कृत्य करू नये, असा इशारा दिला. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही. यामुळेच आम्ही तिथे जाऊन दंगल घडवणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर देवाचे नामस्मरण करणार आहोत, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरलो नाही -हनुमान चालीसा पठण करणे ही आमची संस्कृती आहे. प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करण्यात येते. संकट मोचन हनुमानाची पूजा केल्यामुळे संकट टाळले जातात. सध्या राज्यभर अनेक संकटे आहेत. महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर व्हावी या उद्देशानेच आम्ही मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करावे, असे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. आम्ही बालपणापासून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकत आलो आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही विसरलो नाही, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा -डॉ. अनिल बोंडे यांना मानसोपचाराची गरज; काँग्रेसने रूग्णालयात केली नोंदणी

ABOUT THE AUTHOR

...view details