अमरावती-खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
खासदार नवनीत राणांची परराष्ट्र व्यवहार समितीवर नियुक्ती - Amravati MP navneet rana
खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय धोरण ठरविणे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊन करावयाच्या उपाययोजना व त्या संदर्भात केंद्र शासनाला सल्ला देणे आदी महत्वाची कामं या समितीद्वारे करण्यात येतात.
![खासदार नवनीत राणांची परराष्ट्र व्यवहार समितीवर नियुक्ती नवनीत राणा परराष्ट्र व्यवहार समितीवर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:38:31:1601514511-mh-amr-01-navneet-rana-on-parasite-society-committee-vis-7205575-01102020003041-0110f-00000-99.jpg)
या समितीमध्ये जेष्ठ सदस्य पी.चिदंबरम, कपिल सिब्बल, जया बच्चन, मिनाक्षी लेखिसह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय धोरण ठरविणे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊन करावयाच्या उपाययोजना व त्या संदर्भात केंद्र शासनाला सल्ला देणे आदी महत्वाची कामं या समितीद्वारे करण्यात येतात. देशाचे परराष्ट्र धोरण, आंतरिक सुरक्षा व आंतरराष्ट्रीय सलोखा राखण्याचे कामही या समितीद्वारे केले जाते. आशा महत्त्वपूर्ण समितीत नवनीत राणा यांचा समावेश होणे ही गौरवाची बाब असून त्यांच्या या नियुक्तीमुळे युबस्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.