अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात मुलींना जन्म देणाऱ्या मातांचे साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करा, असा संदेश सत्व बहुद्देशीय संस्थेकडून देण्यात आला.
महिला दिनी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडीचोळी देऊन सत्कार - district hospital
मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून आज जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात दोनशे मातांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला. सत्व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्षा शरयू ठाकरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिन
मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून आज जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात दोनशे मातांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला. सत्व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्षा शरयू ठाकरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक महिला उपस्थित होत्या. मुलीच्या जन्माचे स्वागत करा. मुलगी हीच खरी लक्ष्मी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद बाळगू नका, असा संदेश महिलांनी यावेळी दिला.