अमरावती -दीड महिन्यांच्या बाळाच्या हत्ये प्रकरणी राजापेठ पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षींच्या आधारे बाळाची आई नम्रता मनिषसिंग परमार हिला गुरुवारी दुपारी अटक केली. 30 नोव्हेंबर रोजी न्यु प्रभात कॉलनीतील दिलीप चौहान यांच्याच घराच्या आवारातील विहिरीत बाळाचा मृतदेह आढळून आला होता. चार दिवसांच्या चौकशीनंतर राजापेठ पोलिसांनी अखेर या हत्याप्रकरणात ठोस पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
जबाबांमध्ये तफावत
घटनेच्या दिवशी बाळ धैर्यसिंगची आई आणि मामा हे दोघेच घरी होते. त्यामुळे संशयाची सुई या दोघांवरच होती. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी मामा व आईची कसून चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी 11 सदस्यांचे जबाब नोंदविले होते. परंतू बाळाच्या हत्येचा उलगडा झाला नाही. धैर्यसिंगचे वडील मनिषसिंग परमार यांचा जबाब नोंदविणे बाकी होते. त्यांच्या जबाबातून काही नवीन तथ्ये समोर येईल, असे पोलिसांना वाटले. 3 डिसेंबर रोजी मनिषसिंग परमार हे अमरावतीत पोहोचले. त्यांचा जबाब पोलिसांना नोंदविला. सर्वांच्या जबाबांची पोलिसांनी पडताळणी केली असता, यामध्ये तफावत आढळून आली. घरात दोघेचे असताना बाहेरील कुणी घरात शिरला नाही. तसेच नम्रता केवळ बाथरुमला गेली होती. दरम्यान धैर्यचे अपहरण झाले. ही बाब संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानुसार पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळावरची स्थिती लक्षात घेता आरोपी नम्रताला अटक केली.
हत्येचे कारण चौकशीत स्पष्ट होणार -