अमरावती - मोर्शी वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन काँग्रेसच्या नगरसेवकाने दोन साथीदारांसह शनिवारी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मारहाण; फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने केली कारवाईची मागणी - मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी मारहाण प्रकरण
गणेशवार याने सुरतने यांना आधी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून रेतीची अवैध वाहतूक करण्याबाबत विचारणा केली. मात्र, रेतीची अवैध वाहतूक करता येणार नाही, असे सुरतने यांनी स्पष्ट केली होते. यानंतर काही वेळातच योगेश गणेशवार त्याच्या दोन साथीदारांसह सुरतने यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी सुरतने यांना मारहाण केली.
![मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मारहाण; फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने केली कारवाईची मागणी amravati latest news morshi forest range officer beaten मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी मारहाण प्रकरण अमरावती लेटेस्ट न्युज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7528794-979-7528794-1591613014545.jpg)
मोर्शी आणि लगतच्या परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरतने यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे अवैधरित्या रेतीची चोरी करणाऱ्यांची गोची झाली आहे. शुक्रवारी काँग्रेसचे नगरसेवक योगेश गणेशवार याने सुरतने यांना आधी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून रेतीची अवैध वाहतूक करण्याबाबत विचारणा केली. मात्र, रेतीची अवैध वाहतूक करता येणार नाही, असे सुरतने यांनी स्पष्ट केली होते. यानंतर काही वेळातच योगेश गणेशवार त्याच्या दोन साथीदारांसह सुरतने यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी सुरतने यांना मारहाण केली. यानंतर ते तिघेही पसार झालेत. सुरतने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक योगेश गणेशवार व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सोमवारी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर करून आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी कैलास भुम्बर, संतोष धापड, प्रदीप बाळापूरे, यादव तरटे, जयंत वडतकर, विशाल बनसोड आदी अधिकारी उपस्थित होते.