महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ५ हजारहून अधिक बोगस मतदान; शेखर भोयर यांचा आरोप - bogus teacher voting accusation amravati

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 5 हजारहून अधिक बोगस शिक्षकांनी मतदान केले असून, ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आणि निवडणुकीत पराभूत झालेले शेखर भोयर यांनी केली.

Teachers Federation President Shekhar Bhoyar
शेखर भोयर

By

Published : Dec 26, 2020, 8:11 PM IST

अमरावती - विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 5 हजारहून अधिक बोगस शिक्षकांनी मतदान केले असून, ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आणि निवडणुकीत पराभूत झालेले शेखर भोयर यांनी केली. या संदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

माहिती देताना शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आणि निवडणुकीत पराभूत झालेले शेखर भोयर

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यातील संत्री उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या; करार शेतीचा बळी..?

1 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत प्राथमिक शाळेचे शिक्षक, नर्सिंग कॉलेज, खासगी शाळेतील लिपिक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, तसेच ज्या शाळाच अस्तित्वात नाही अशा शाळांमधील बनावट शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक लागला असल्याचे शेखर भोयर म्हणाले.

शिक्षक आमदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर व्हावी कारवाई

खोटेपणा करून निवडणुकीत विजयी झालेले अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. या आमदारांनी गैरमार्गाने ही निवडणूक जिंकली असून 12 ऑक्टोबरला मी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. माझ्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने बोगस मतदारांनी मतदान केले, असेही शेखर भोयर म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर करणार आंदोलन

शिक्षक मतदारसंघ हा पवित्र मतदारसंघ समजला जातो. असे असताना या मतदारसंघात प्रचंड घोळ करून चुकीच्या पद्धतीने कोणी निवडून येतो, हे योग्य नाही. आता निवडून आलेल्या व्यक्तीच्या मागे कोण मंडळी आहे, हे निवडणुकीनंतर त्यांचे फोटो समोर आल्यावर उघड झाले आहे. ही निवडणूक पूर्णतः बेकायदेशीर असून आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी आणि माझे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा शेखर भोयर यांनी दिला.

हेही वाचा -नांदेड : निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details