अमरावती- लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने तरुणवर्ग विरंगुळ्याखातर नदीवर पोहायला जाने पसंत करत आहेत. त्यांच्या इच्छापुर्तीला हवामानाची देखील साथ लाभली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर पाऊस झाला. त्यामुळे, पश्चिम विदर्भातील सर्व पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र, पोहण्याचा नाद तरुणांच्या जिवावर देखील बेतत आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पश्चिम विदर्भातील १०० पेक्षा जास्त तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पोहण्याच्या नादात पश्चिम विदर्भातील १००पेक्षा जास्त तरुणांनी गमावला जीव - amravati lockdown youth
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर पाऊस झाला. त्यामुळे, पश्चिम विदर्भातील सर्व पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र, पोहण्याचा नाद तरुणांच्या जिवावर देखील बेतत आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पश्चिम विदर्भातील १०० पेक्षा जास्त तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
लहान वय म्हटले की त्यात खेळणे आले. पूर्वीच्या काळी विरंगुळा म्हणून अनेक जण पोहायला नदीवर जायचे. परंतु, कालांतराने ही संख्या शहरात कमी झाली. मात्र, ग्रामीण भागातील तरुण आजही मोठ्या संख्येने नदी, तलाव विहिरीवर पोहायला जातात. मात्र, त्यांचा हा खूळ जीवघेणा ठरत असल्याचे समोर आले आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसात पोहण्याच्या नादात २० जणांनी आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे असून, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा सल्ला मानोसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा-आरोग्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कोरोना रुग्ण धडकला जिल्हाधिकारी कार्यालयात