महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; नागरिकांना अनुभवला गारवा - farmer

गेल्या आठवड्यात उन्हाच्या पारा हा जवळपास ४५ अंशाच्या वर होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक बदललेल्या वातावरणामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

By

Published : Jun 5, 2019, 7:29 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील दुपारच्या सुमारास आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन चार महिन्यांपासून तसेच गेल्या आठवड्यात उन्हाच्या पारा हा जवळपास ४५ अंशाच्या वर होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक बदललेल्या वातावरणामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार पाऊस पडला. वादळ वाऱ्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली होती. महाराष्ट्राने प्रचंड उन्हाचा सामना केला. आता लवकर पाऊस दाखल व्हावा, अशी प्रार्थना आता बळीराजा करत होता, आणि आज पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सध्यातरी बळीराजा थोडासा सुखावला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details